संजू परब: आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा…
⚡सावंतवाडी ता.२२-: प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे गुण असतात त्यामुळे मुलांना प्राधान्य दिले पाहिजे शिक्षकांनी देखील पालकांना सांगावे मुलांना इच्छाप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना आपला छंद जोपासाव ज्या क्षेत्रात आपल्याला योग्य वाटेल त्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊन करियर करावे,असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे शालेय विद्यार्थ्यांना केले. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संजू परब यांनी आज सावंतवाडी शहरात शाळा नंबर चार व एस पी के कॉलेज मध्ये वह्या वाटप केले तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना डेटॉल हॅन्ड वॉश वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी परब पुढे म्हणाले आजच्या मुलांमध्ये टॅलेंट हे भरपूर आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज मुलं भरारी घेत आहेत त्यामुळे असेच तुम्ही देखील आपल्या आवडत्या करिअरमध्ये करिअर करून आपले नाव देशाच्या उज्वल करावे असे गैरउद्गार देखील श्री परब यांनी काढले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भाजपच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देखील श्रीपरप्यांनी यावेळी दिली.

यावेळी युवराज लखमराजे भोसले, जिल्हा चिटणीस महेश सारंग,शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, बंटी जामदार, परीक्षेत मांजरेकर दिलीप भालेकर,विनोद सावंत, सचिन साटेलकर, संजय शिरोडकर ,सत्यवान बांदेकर, सबस्टीन डिसोजा, महेश पांचाळ अमित परब दीनानाथ नाईक आदी उपस्थित.
