सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन…

⚡सावंतवाडी ता.२२-: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 22 23 व 24 जून या कालावधीमध्ये तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन सावंतवाडी पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

योग शिबिराचे उद्घाटन शनिवारी 22 जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाप्रमुख अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे तीन दिवसीय शिबिर सावंतवाडी शिवाजी चौक वैश्य भवन येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे या शिबिरास योगशिक्षक विकास गोवेकर दत्तात्रय निखार्गे व विद्याधर पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहे या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये रामनाथ सामंत दत्तात्रय सडेकर मीना सामंत तानाजी वरक रामजी परब व शरद कालेलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
तरी या शिबिरात महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन पतंजली योग समितीचे महेश भाट वैश्य समाज सावंतवाडी चे अध्यक्ष रमेश बोंद्रे आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे
या शिबिरात सहभागी होणाऱ्या साधकानी येताना सैल कपडे परिधान करून यावे तसेच सोबत स्वतःला बसण्यासाठी जाजम आणावे असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page