सर्वेश गोवेकर यांच्यातर्फे  बांदा गांधीचौकात कचराकुंड्या प्रदान…

⚡बांदा ता.२१-:  बांदा येथिल व्यापारी विशेषत: हॉटेल व्यवसायिक यांची ओला कचरा संकलनाची समस्या लक्षात घेऊन बांद्यातील व्यापारी सर्वेश गोवेकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंड्या बांदा गांधीचौक येथे लोकांसाठी प्रदान केल्या.

   बांदा ग्रामपंचायतीने प्रस्तावित गोबर्धन प्रकल्पासाठी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यास आरंभ केला आहे.सर्व नागरिकांना हे सुलभ असले तरी हॉटेल व्यावसायिकांचा ओला कचरा जास्त प्रमाणात असल्याने व तो रात्रभर दुकानात संकलित ठेवणे शक्य नसते.त्यामुळे तो रात्रीच्या वेळी स्वतंत्रपणे संकलित करावा,त्यासाठी वेगळे शुल्कही ठेवावे तसेच गांधीचौक येथे यासाठी कचराकुंड्या ठेवाव्यात अशी मागणी सर्वेश  गोवेकर यांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्वेश गोवेकर यांनी आपणच स्वखर्चाने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वखर्चाने दोन कचराकुंड्या दिल्या.व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते   अजय महाजन यांच्या हस्ते या कुंड्यांचे लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी अर्णव स्वार,विवेक विरनोडकर, मयुरेश महाजन,राज नलावडे, प्रथमेश गोवेकर, गौरव नाटेकर आदी उपस्थित होते.बांद्यातील व्यापारी आणि बांदा ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी दोघांनाही सुलभ पडावे यासाठी आपण हा उपक्रम केल्याचे सर्वेश गोवेकर यांनी यावेळी सांगितले.

फोटो – (बांदा गांधीचौक य़ेथे कचराकुंड्या प्रदान करताना सर्वेश गोवेकर,अजय महाजन,अर्णव स्वार व अन्य)

You cannot copy content of this page