कारवीडे शाळेच्या नुकसानीची मंत्री केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल…

पालक व ग्रामस्थांनी मानले आभार

⚡सावंतवाडी ता.२१-: कारवीडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर वरील कोसळलेले कैले कोसळून शाळेचा किरकोळ नुकसान झाले होते याबाबत तात्काळ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेतली असून त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून तात्काळ डागडुजी करून देण्यास सुरूवात केली.त्यामुळे शाळेचे व्यवस्थापकासह सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी मंत्री श्री.दिपक केसरकर यांचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेचे छपरावरील कैले कोसळून शाळेचे किरकोळ नुकसान झाले होते. याबाबत रवी परब यांनी लक्ष वेधले होते त्यानंतर तात्काळ मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून पाहणी केली व तात्काळ आपण डागडुजी करून देतो असे आश्वासन दिल्याने कारीवडेवासीयांनी मंत्री केसरकर व मित्र मंडळाचे आभार मानले.

You cannot copy content of this page