विनायक राऊत यांचे काही दिवस शिल्लक; त्यांच आत डिपॉझिट जप्त होणार…

मंत्री दीपक केसरकर: सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन..

सावंतवाडी ता.२०-: विनायक राऊत यांचे काही दिवस शिल्लक उरलेत त्यामुळे त्यांच्यावर फार काय बोलणार नसून त्यांचं डिपॉझिट आता जप्त होणार आहे. अशी टीका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.

दरम्यान नारायण राणे कोकणात अनेक विकासात काम केले आहेत, त्यामुळे विनायकरावतानी गेल्या दहा वर्षात कोणती विकास काम केली हे त्यांनी जाहीर करावे.? फक्त त्यांनी विरोध करण्याचं कामच केलं त्यामुळे जनतेचा विश्वास हा राणेंवरच असून त्यामुळे राणेंचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास देखील श्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी श्री मंत्री राणे यांच्या हस्ते सावंतवाडी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

You cannot copy content of this page