मालवणात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती…

⚡मालवण ता.२०-: आपण सारे करू वोटिंग, भविष्याची करू सेटिंग… अशा विविध घोषणा देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेतर्फे मालवण शहरात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी दि. १६ ते १ मे या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार मालवण शहरात पथनाट्यसह मतदार सेल्फी पॉईंट, मतदार स्वाक्षरी मोहीम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अनुषंगाने मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ, भरडनाका, एसटी स्टँड येथे मालवण न.पा.तर्फे ओरोस येथील आर्टस, कॉमर्स, कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page