ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवलीत शिवजयंती साजरी…

⚡कणकवली ता.२८-: ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवली शहर कार्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खा. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

शिवजयंती निमित्त कणकवली शहर कार्यालयात श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर, कणकवली शहर संघटक जयेश धुमाळे, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, कणकवली तालुका प्रमुख माधवी दळवी, सुजित जाधव, तेजस राणे, सी आर चव्हाण, निसार शेख, दिव्या साळगावकर, वैदही गुडेकर, धनश्री मेस्त्री, महेश कोदे, चंदू परब आदी उपस्थीत होते.

You cannot copy content of this page