शिंदे गटात प्रवेश केल्याच्या रागातून धमकी…

कणकवलीतील प्रकार; दोघांवर गुन्हा दाखल..

कणकवली-:शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून मोठा झालास काय? अशी धमकी देत होळीचे पैसे दिले नाहीस तर तुझ्या गाड्या जाळून टाकणार व ठार मारणार अशी धमकी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजू राठोड व रिमेश चव्हाण यांनी दिली अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. या तक्रारीनुसार राजू राठोड व रिमेश चव्हाण यांच्या विरोधात कणकवली पोलिसात 504, 506, 34 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

20 मार्च रोजी फिर्यादी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे राजू राठोड व रमेश चव्हाण यांनी वरील प्रकारे फोन द्वारे धमकी दिली. दरम्यान यानंतर शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या गाड्याजवळ सोमवारी रात्री 1 वाजल्या पासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page