⚡कुडाळ ता.२३-: युवा फोरम भारत संस्थे तर्फे वेतुरे येथे होडावडेकर नर्सरी यांच्या सहयोगाने रोप वाटीकेचे लोकांना हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी संस्थे चे अध्यक्ष ऍड यशवर्धन राणे, सचिव ऍड हितेश कुडाळकर, सदस्य सर्वेश पावस्कर, रोहन करमळकर तसेच माजी उपसभापती गोखले मॅडम, व शुभम गोगटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला बऱ्याच शेतकऱ्यांनी हजेरी लावली गावचे सरपंच यांनी देखील सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला शोभा वाढवली. यावेळी हितेश कुडाळकर, यशवर्धन राणे राणे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी उपस्थित दर्शवली.
