⚡मालवण ता.२२-: मालवण येथील भंडारी ए. सो हायस्कूलमध्ये २१ जून हा जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना वने आणि वन दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले. तसेच समाजात वन दिवसाचे महत्व समजण्यासाठी घोषणा देत उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांची मालवण शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत तिवले उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरण मालवणचे अधिकारी श्री.जगदाळे व श्री. शिंदे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी जागतिक वन दिन का साजरा केला जातो याबद्दल विद्यार्थिनी कु. दिया गोलतकर हीने आपले विचार सांगितले. मानवी जीवनात वनाचे महत्त्व बाबत शिक्षक श्री. अवसरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिक्षक श्री. बनसोडे, श्री.गोसावी व विद्यार्थी उपस्थित होते.
