निवडणूकीत पक्ष निधी मिळाला नाही हे केसरकरांनी देवाची शपथ घेऊन सांगावे…

विनायक राऊत ; मंत्रीपद मिळाले नाही म्हणून माझ्यावर आरोप करण्याचे काम.

⚡सावंतवाडी ता.२२-: दीपक केसरकर यांनी काजू शेतकऱ्यांना भाव वाढवून दिला नाही. बोंडूचा रस काढण्यासाठी मशिनी फुकट दिल्या. रस काढायला सुरू केल्यावर पोलीस दारात उभे राहीले.शरद पवारांशी बेईमानी करून आलेले केसरकर आपल्या तोंडाला पानं पुसणार हे उद्धव ठाकरेंना सांगितले होतं. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.

दरम्यान दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विनायक राऊतांवर आरोप करण्याच काम केलं. एक कोटीचा चेक दिल्यास सांगणाऱ्या केसरकरांनी निवडणूकीच्यावेळी पक्षाकडून निधी मिळाली की नाही हे सावंतवाडीच्या आराध्य दैवतांची शपथ घेऊन सांगाव असं आव्हान त्यांनी दिलं.

You cannot copy content of this page