देवगड शहरात सुरक्षा यंत्रणेचे संचलन…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी राबविला उपक्रम..

देवगड
लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडू नये व निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडावा या करिता सोमवारी सकाळी १० .०० वा. देवगड शहर व जामसंडे बाजारपेठ या ठिकाणी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी ,कर्मचारी ,आरसिपी जवान यांनी संचलन केले.यात तीन पोलीस अधिकारी,४३ पोलीस अंमलदार उपस्थित होते .त्यांना रूट मार्च,निवडणूक आचारसंहितेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

You cannot copy content of this page