तिरोडा येथील क्रिकेट स्पर्धेत एड्रीयल स्पोर्ट्स संघ विजेता…

माजी आमदार जीजी उपरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण..

⚡सावंतवाडी ता.१८-: आई देवी माऊली युवक मित्र मंडळ तिरोडा आयोजित माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर पुरस्कृतक्रिकेट स्पर्धेत
एड्रीयल स्पोर्ट्स संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच माऊ स्पोर्ट्स यांनी द्वितीय पारितोषिक पटकवत उत्तुंग अशी कामगिरी केली. चषकाचे आज बक्षीस वितरण माजी आमदार जीजी उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी आशिष सुभेदार, आयोजक मनोज कांबळी, पंकज पेडणेकर, ओमकार गावडे,विजय उर्फ अण्णा गावडे, दादा पालकर, हर्षद केरकर, अनिकेत पटेकर उपस्थित होते. सर्व सहकाऱ्यांचे आशिष सुभेदार यांनी आभार मानत पुढील वर्षी माजी आमदार उपरकर यांच्या माध्यमातून तिरोडा गाव मर्यादित अजून भव्य दिव्य अशी तिरोडा गाव मर्यादित मॅचेस भरवण्यात येणार असल्याचे श्री सुभेदार यांनी जाहीर केले. माजी आमदार जीजी उपरकर व व आयोजन केलेल्या सर्व सहकारी मित्रांचे मंदार नाईक यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page