उपअभियंता सगळे यांचे माजी नगरसेवक सुरेश भोकरे यांना आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.१४-:
शहरात मुंबई गोवा जुन्या राष्ट्रीय महामार्गावर घालण्यात आलेल्या रम्बलींग स्ट्रिप्स मुळे वाहनांना बसणार्या हादर्याची तीव्रता लक्षात घेता ती कमी करण्यासाठी सदर स्ट्रिप्स जवळ येत्या आठ दिवसात पांढरे पट्टे मारण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांनी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. श्री भोगटे यांनी यांनी सदरचे रम्बलींग स्ट्रिप्स काढण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती या पार्श्वभूमीवर आज झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला.
सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रम्बलींग स्ट्रिप्स घातले आहेत यासंदर्भात श्री भोगटे यांनी आवाज उठवित सदरचे रम्बलिंग स्ट्रिप्स काढून काढून टाका अन्यथा हा आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे पत्र बांधकाम विभागाला दिले होते ज्या दिवशी हे काम सुरू होते त्या दिवशी आंदोलनात्मक भूमिका ही घेत काम बंद पडले होते. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली यावेळी श्री भोगटे यांच्यासह सुधीर पराडकर बावतीस फर्नांडिस सत्यजित देशमुख दीपक सावंत हर्षवर्धन धारणकर आधी उपस्थित होते झालेल्या चर्चेमध्ये वाहन चालकांना बसणारा हादरा तसेच वाहनांचे होणारे नुकसानी याबाबत श्री भोगटे यांच्यासह उपस्थित त्यांनी लक्ष वेधले दरम्यान हादऱ्याची तीव्रता कमी करण्यासाठी रम्बलींग स्ट्रिप्स जवळ पांढरे पट्टे मारण्याची कार्यवाही हाती घेतली जाईल हे काम येथे आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन श्री सगरे यांनी दिले.
