टर्मिनससाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

सागर नाणोसकर: रेल्वेच्या विविध प्रश्न सुटण्याबाबत होणार आंदोलन..

⚡सावंतवाडी ता.२५-: २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर नाणोसकर यांनी केली आहे . याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी २६ जानेवारीला आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तब्बल १६ वर्षे हा रकडला आहे. त्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला आहे. मात्र आता मठकर यांचे नातू मिहीर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी टर्मिनस पुर्ण करण्यासाठी शिवधनुष्य उचलला आहे. त्यासाठी येथील जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page