वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना घेतले ताब्यात…

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहिती:रात्री उशिरा न्यायालयात करणार हजर..

⚡सावंतवाडी ता.२४-: वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. यात एक युवक दोन युवती तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे त्याला रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की सावंतवाडी शहरातील एका युवकाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट आपल्या अकाउंट वरून सोशल मीडियावर शेअर केली होती यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांमध्ये संतप्त भावना उमटून त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा ची मागणी केली होती मंगळवार व बुधवारी दोन्ही दिवस संतप्त नागरिकांनी याबाबत आवाज उठवला होता मंगळवारी या प्रकरणी एका युवकाला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंट वरून अधिक माहिती घेत या पोस्ट प्रकरणी अन्य सहभागी दोन युवतींना व दोन अल्पवयीन मुलांना बुधवारी दिवसभरात ताब्यात घेतले.

एकूणच वादग्रस्त पोस्टमुळे सावंतवाडी शहरांमध्ये दोन्ही दिवस प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस ठाण्यावर नागरिकांच्या जमावाचा रोष पाहता अन्य पोलीस ठाण्यातून पोलीस कुमक मागवण्यात आली होती पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे तसेच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी ठाण मांडून होते सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होत वस्तुस्थितीची माहिती घेतली तसेच कुठेही तणाव निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले तसेच संतप्त जमावालाही त्यांनी सामोरे जात कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घ्या असे आवाहन केले एकूणच त्यांच्या विनंतीनुसार संतप्त जमावाने काहीशी माघार घेतली.
दरम्यान या प्रकरणात एकूण पाच जणांना ताब्यात घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये एका गुन्ह्यात दोघांवर तर एका गुन्ह्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोघेजण अल्पवयीन एकाच्या इंस्टाग्राम अकाउंट च्या आयडीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी त्यांनी सांगितले तर अन्य तिघांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार ते म्हणाले ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सावंतवाडी तालुकावाशीयांना आवाहन करताना सर्वांनी जातीय सलोखा व सामाजिक शांतता राखावी कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने कायदा हातात घेऊ नये, सोशल मीडियावर कोणत्याही वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही अफवा पसरवू नये असे म्हटले आहे.

You cannot copy content of this page