फोटो काढल्यास जशासतसे उतर देऊ:कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेचा इशारा..
⚡सिंधुदुर्गनगरी २१-: कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्यातील चित्राचे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त तैलचित्राचे अनावरण पूजन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने असे तैलचित्र लावणे योग्य नसल्याचे व सदर चा फोटो काढण्याबाबत केलेल्या विरोधाला सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेने कडाडून विरोध करून दडवेतेच्या तैलचित्राला विरोध का? जर हे तैलचित्र काढले गेल्यास आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडूरा ते खारेपाटण पर्यंतच्या सर्व स्टेशन प्रवासी संघटनांना आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे .
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर त्यांच्या तैलचित्राचे अनावरण कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले कोकणात कोकण रेल्वे यावी यासाठी प्राध्यापक मधु दंडवते यांनी अर्थमंत्री असताना कोकण रेल्वेचा मुहूर्त स्वरूप दिले प्रत्यक्षात रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या बजेटनुसार कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात केली सिंधुदुर्ग स्टेशनवर त्यांनी प्रत्यक्षात पायाभरणीचा कार्यक्रमही केला होता परंतु सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे जिल्हा मुख्यालयाचे स्टेशन असूनही काही महत्त्वाच्या जलद गाड्यांना थांबा देण्यास आणि सुस्थिती बाबत रेल्वे प्रवासी संघटनेने आवाज उठविला प्राध्यापक दंडवते यांची आज जन्मशताब्दी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्टेशनवर त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करावे असे प्रवासी संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले होते वास्तविक केंद्र सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने याबाबत यापूर्वीच निर्णय घेऊन त्यांचे तैलचित्र लावणे आवश्यक होते परंतु प्रवासी संघटनेने याबाबत घेतलेला निर्णय हा सत्य असून आजच्या जन्म शताब्दी निमित्त त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले याबाबत रेल्वे प्रवासी वर्गाकडून स्वागतच होत आहे कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले काम कोकणवासीयांच्या मनात आणि सर्वांच्या दृष्टीने वाखांडनेजोगे असल्याचे सिंधुदुर्ग प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब सचिव प्रकाश पावसकर यांनी बोलताना व्यक्त केले
गेल्या आठ दिवसांपूर्वी या कोकणरेल्वे प्रवासी संघटना सिधुदर्गच्या वतीने निवेदन देऊन या रेल्वे स्टेशनवर तैलचित्र लावण्या बाबत पत्र देण्यात आले होते गेल्यासात दिवसात ऑनलाईन कारभार असतानाही यावर रेल्वेच्या प्रमुख अधिकार्यानी रेल्वेस्टेशन मास्तरना पत्र देण्या ऐवजी माझ्याकडे यायला हवे होते रिझनल मॅनेजर यांनी सांगीतले यावर आम्ही मधु दंडवते हे रेल्वेचे शिल्पकार आहेत म्हणुन तैलचित्र लावले ते काढा मग आम्ही आमचा निर्णय ठरवू जिल्ह्यातोल सर्वच रेल्वे प्रवाशी संघटनेचा संघटनेचा ठाम निर्णय आहे ,वास्तवीक याबाबत रेल्वे बोर्डीने शताब्दी वर्ष पर त्याचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला पाहीजे हवा होता पण तो घेतला नाही असे सिधुदुर्ग रेल्वे संघटना पदाधीकारी यानी रेल्वेच्या आरसीएफ कर्मचार्याना सांगीतले ,
यावेळी उपाध्यक्ष मिर मठकर , सागर तळवडेकर , सुभाष शिरसाठ , तेजस पोयरेकर , संतोष वालावलकर कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर ,रानबाबुळी सरपंच ‘परशुराम परब , सुप्रिया वालावलकर ,सुहास परब ,भाऊ पाताडे , किशोर पेडणेकर , प्रणिता अवसरे ,अजय मयेकर , स्वप्निल गावडे , सुनिल पाताडे आदींसह रानबांबुळी ,ओरोस , अणाव , सुकळवाड ,पडवे पंचक्रोतील ग्रामस्थ प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सोबत फोटो
