जिल्ह्यात मंदिर परिसरातील स्वच्छता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡ओरोस ता.२०-: शासनाने दिलेल्यासूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंदिर परिसर साफसफाई उपक्रम एकाच वेळेत ठिकठिकाणी राबवून मंदिर परिसर स्वच्छता केली यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग होता मंदिर परिसरामध्ये या स्वच्छतेच्या उपक्रमाबरोबर धार्मिक उपक्रमालाही चांगलाच उत्साह निर्माण झालाआहे
अयोदया राममूती प्रतिष्ठापना पाश्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी स्वछतेबाबतदिलेल्या सुचना नुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी सकाळी ९ ते ११ या कालावधीत स्वच्छ कार्यक्रम पार पडला.
अयोध्या येथील राममूर्तीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदीरामध्येविविध कार्यक्रम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा एकाच वेळी एकाच दिवशी स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ओरोस , गावराई , सुकळवाड ,कसाल , रानबाबुळी , पंचक्रोशी सह जिल्हयातील सर्वच मंदीरामध्ये परिसर स्वछता कार्यक्रम त्यात्या ग्रा.प सरपंच ग्रामसेवक ग्रा.प.सदस्य शालेय विद्यार्थी शिक्षक यांचा मोठा सहभाग होता रामलला च्या या कार्यक्रमामुळ मंदीर परिसरा सहगावागावात उत्साहाचे धार्मिकतेचे वातावरण आहे ओरोस येथे सरपच मुरमू ,सुकळवाड येथे सरपंच युवराज गरुड , गावराई येथे सरपंच सोनल शिरोडकर ,रानबांबुळी येथे परशुरामपरब , कसाल राजन परबतर पत्येक गावामध्ये मंदीर परिसर स्वछता उपक्रम राबविला .

  ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम राबविणेबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचेकडुन सूचना प्राप्त झालेल्या होत्या.  या संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणा यांचा सहभाग घेवून मोठया प्रमाणात मंदीर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आला. चाशिवाय 22 जानेवारी रोजीही स्वछता मोहीम राबविली जाईल यामध्ये रस्ते स्वच्छ धूळमुक्त करणे, गल्लीबोळातील कचरा काढणे, गटारे, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांचा परिसर स्वच्छ करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, अनाधिकृत फलक, भित्तीपत्रके, बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकणे, तसेच ग्रामणी भागातील सार्वजनिक ठिकाणांवर दर्शनी भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करणे अशा कार्यवाहीचा समावेश करण्यात  करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक आपल्या कार्यक्षेत्रात दिनांक 22/01/2024 पर्यत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये स्वच्छता अभियान व रोशणाई करण्याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचेकडुन सूचना प्राप्त असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व मंदिरे व आसपासच्या परिसरातील स्वच्छता मोहिम कार्यक्रमांचे आयोजन एकाच दिवशी दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत करण्यात आली. सोबत फोटो

You cannot copy content of this page