कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी..
सिधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर पीआरएसी तिकीटकोटामिळावा ,एलटीटी मडगाव , नागपूर ,पुणा जनशताब्दी ,नेत्रावती गाड्यांना थांबा मिळावा यासह विविध मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वे प्रशासनाचे संजय दत्त यांच्यामार्फत रेल्वे बोर्डाकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग च्या वतीनेमागणी केली आहे .
कोकण रेल्वे प्रशासनाचे संजय दत्त यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वेच्या काही प्रश्नाबाबत प्रवासी संघटनांची चर्चा केली. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वरील प्रश्नाबाबत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब , सचिव प्रकाश पावसकर ,सदस्य स्वप्निल गावडे आदींसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली
यावेळी यावेळी कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग स्थानकावर विविध समस्या मागण्यांबाबत निवेदन सादर केले सिंधुदुर्ग हे रेल्वे स्टेशन जिल्हा मुख्यालयाचे महत्त्वाचे स्टेशन असून या स्टेशनवर सध्या कोकण कन्या , मांडवी , सावंतवाडी दादर अशा जलद गाड्या थांबतात जिल्ह्याचे मुख्यालय असूनही जलद गाड्यांना थांबा मिळत नसल्यामुळे रेल्वे तिकीट कोटा ही या स्टेशनवर उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कामानिमित्त मुंबई व अन्य ठिकाणी जाताना कुडाळ कणकवली जावे लागते जिल्हाचे मुख्यालय असलेले स्टेशन सिंधुदुर्ग असूनही येथे योग्य त्या सुविधा नाहीत रेल्वे प्रशासनाने या न्याय प्रश्नावर लक्ष द्यावे अशी मागणी करणारे निवेदन सादर करताना सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरपश्चिम दिशेच्या बाजून रस्ता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर निवारा शेडसायंकाळची सावंतवाडी दादर लोकल ट्रेन सोडावी अशा विविध मागण्यांबाबत येथील प्रवासी आक्रमक असून सावंतवाडी येथील टर्मिनल ही पूर्ण व्हावे जेणेकरून या टर्मिनल वरून सावंतवाडी सीएसटी नव्याने रेल्वेमिळू शकेल महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या या सावंतवाडी स्टेशनवर टर्मिनल व्हावे कोकण रेल्वे मार्गावरून गोवा , केरळ या दिशेने जाणाऱ्या सुमारे १५ गाड्या सिंधुदुर्ग थांबत नाहीत त्यापैकी काही गाड्यांना सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन सुसज्ज व्हावे आधी मागण्यांचे निवेदन सादर केले आहे यावर संजय दत्त यांनी आपल्या या न्याय मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाकडे निवेदन सादर करू असे आश्वासन दिले [सोबत फोटो ]
