सावंतवाडीत २१ जानेवारीला अयोध्या महानाट्याचा प्रयोग…

राजन तेली:राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आयोजन

⚡सावंतवाडी ता.१९-: अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधू संकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून रविवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर भारत वर्षातील अलौकिक धर्म युद्धावर आधारित ‘अयोध्या ‘ हे महानाट्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. हे महानाट्य विनामूल्य असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी केले.

सावंतवाडी येथील विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी शहर अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, गुरु मठकर, परीक्षेत मांजरेकर, अमित परब, दिलीप भालेकर, विनोद सावंत, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

अयोध्या हे महानाट्य राम मंदिरच्या पाचशे वर्षांच्या इतिहासावर आधारित आहे. मुघल बादशहा ‘बाबराने राम मंदिर पाडल्यानंतर ते राम मंदिराच्या निर्माणापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम या महानाट्यात दाखविण्यात आलेला असून अतिशय सुंदर व उत्तम असे लिखाण व दिग्दर्शन तसेच कलाकारांची निवड व सादरीकरण सर्वोत्तम असल्याने हे नाटक अतिशय प्रेक्षणीय आहे, असेही त्यांनी सांगितल

You cannot copy content of this page