कणकवली नगरपंचायतमार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान…

श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र परिसरात स्वच्छता..

⚡कणकवली ता.१८-: जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे आदेशानुसार कणकवलीत नगरपंचायत च्यावतीने स्वच्छता मोहीम’ राबविण्‍यात आली.
कणकवली नगरपंचायतीतर्फे १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजलेपासून श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात ‘’संपूर्ण स्वच्छता मोहीम’’ राबविण्यात आली.
‘संपूर्ण स्वच्छ्ता मोहीमेअंतर्गत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र येथे खालीलप्रमाणे कामे करण्‍यात आली.
या परिसरातील उघडयावर टाकण्‍यात आलेला प्‍लॅस्‍टीक कचरा (पॅकेट व बॉटल), काचेच्‍या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल इ. प्रकारचा कचरा वर्गीकृत करुन संकलित करण्‍यात आला.
रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेले गवत, झाडी ग्रासकटरच्‍या सहाय्याने कटींग करुन साफ करण्‍यात आली.
परिसरातील रस्‍ते झाडून स्वच्‍छ करण्‍यात आले तसेच गटारे साफ करण्‍यात आली .परिसरातील अनधिकृत बॅनर,फलक व जाहिराती हटविण्‍यात आल्या.

परिसरातील रस्‍ते धूळमुक्‍त करण्‍यासाठी नगरपंचायतच्‍या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने रस्‍ते धुण्‍यात आले.या अभियानामध्‍ये कणकवली नगरपंचायतीचे सर्व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर ,रोटरी क्लब सदस्य व स्वच्छता दूत दिपक बेलवलकर, जिल्हा जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सीताराम कुडतरकर जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य मनोहर पालयेकर, ज्ञानेश्वर पाताडे, रसिका उपरकर, विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक,विद्यार्थी तसेच कणकवली कॉलेजचे शिक्षक आणि ,जेम्स सामाजिक संघटनाचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला.

You cannot copy content of this page