बिडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार करणार…

⚡कणकवली ता.२८-: बिडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत भव्य मंदिराची संकल्पना नियोजित न्यासाचे उपाध्यक्ष अरविंद परूळेकर यांनी सभेसमोर मांडली. विशेष म्हणजे या सभेत मुंबईतील आर्किटेक्ट यांनीही उपस्थित राहत सहभागी घेतला होता.
   बिडवाडी, कणकवली येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यासाठी बिडवाडी देसाईवाडी ग्रामस्थांची सभा नियोजित मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आली.

नियोजित न्यासाचे सचिव मधुकर वाडेकर आणि उपाध्यक्ष  अरविंद परुळेकर यांनी भव्य मंदिराची संकल्पना सभेसमोर मांडली. यात मंदिराची रचना कशी असावी याबद्दल चर्चा झाली. श्री. परुळेकर यांनी सभेसमोर मंदिराचा नकाशा सादर केला. आणि मंदिर आणि  मंदिराच्या शेजारी उत्कृष्ट स्टेजसहित सभागृह असावे असे प्रतिपादन केले तसेच सदर सभागृह हे जनकल्याणासाठी वापरण्यात यावे आणि तिथे सर्व प्रकारची मंगलकार्य, विविध कार्यक्रम, करमणूक  कार्यक्रम इत्यादी व्हावेत अशी सूचना केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले मुंबईतील प्रख्यात आर्किटेक्ट जयवंत नाईक यांनी सभेस उत्तम मार्गदर्शन केले. तसेच प्रख्यात चित्रकार शांताराम सोनावणे आणि मूर्तिकार चित्रकार अनिल कुबल यांनी सदर संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नेमक काय करावे लागेल यासाठी मार्गदर्शन केले.

उपरोक्त मंदिराच्या जीर्णोद्धारा्साठी कायम मेहनत घेणारे अध्यक्ष विकास भोसले सावंत, सचिव मधुकर वाडेकर आणि सर्व ग्रामस्थ यांचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच सदर मंदिरासाठी आणि सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देणारे  नाना खंदारे यांचे ही आभार मानण्यात आले.सचिव मधुकर वाडेकर यांनी या सभेसाठी मुबईहून खास आलेले आर्किटेक्ट जयवंत नाईक, चित्रकार शांताराम सोनावणे, मूर्तिकार अनिल कुबल यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page