देवी चरणी लीन होत सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे..
सावंतवाडी, ता. २७: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव होत असल्याने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असे गाऱ्हाणे त्यांनी देवी चरणी घातले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सरपंच नारायण हिराप, देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र गावकर, रमेश गावकर, बाळा गावकर, सुरेश गावकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते
