तर तालुका उपाध्यक्षपदी पास्कोल रॉड्रिग्ज;राज ठाकरेंच्या सहीचामे नियुक्तीपत्र प्राप्त..
⚡मालवण ता.२७-: मनसे मालवण तालुकाध्यक्षपदी युवा उद्योजक प्रितम गावडे, तर तालुका उपाध्यक्षपदी देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिग्ज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सहीने नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे.
युवा उद्योजक असलेले प्रितम गावडे हे मनसेच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून सामाजिक कार्यात जोडले गेले आहेत. तसेच विविध उपक्रम ते राबवित आहेत. तर पास्कोल रॉड्रिग्ज यांनी देवबागात ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे.
या दोघांच्याही कार्याची दखल घेत राज ठाकरे यांनी त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करत मालवण तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. मराठी बांधव-भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल, असे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आपणा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असे राज ठाकरे यांनी पदाधिकारी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
