मळगाव येथील रवळनाथ देवाचा जत्रोत्सव उत्साहात

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ- मळगाव येथील पंचांयतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव काल रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, रवळनाथ देवाची पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री ब्राम्हणाच्या साक्षीने पुराणवाचन करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने मंदिरासमोरील दीपस्तंभावर असंख्य दीप पेटविण्यात आले. त्यानंतर तरंगासहीत मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. रात्री उशिरा मळगाव येथील दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मळगाव येथील भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page