⚡कणकवली ता.२६-: जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळांने माजी बिडीओ विजय चव्हाण यांचा मुलगा डॉ. शरण चव्हाण यांच्या रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.
याप्रसंगी अशोक करंबेळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्रमंडळाचे सदस्य अविनाश गावडे, प्रसाद पाताडे, प्रसाद उगवेकर, बाबुराव घाडीगांवकर, भगवान कासले, महेश वायंगणकर, सी. आर. चव्हाण, सईद नाईक, सौ. वैशाली सुर्यवंशी आदी मंडळींनी डॉ. शरण चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
