⚡सावंतवाडी ता.२४-: नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम गुरुवारपासून पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे
या ठिकाणी अद्यावत असे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने मंडईची इमारत पाडण्यात येत आहे. मात्र असे असले तरी मसाले व्यापाऱ्यानी स्थलांतर न करता इमारत पाडण्याचे काम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या इमारतीसाठी पहील्या टप्प्यातील निधी पालिकडे जमा झाला आहे.
