⚡सावंतवाडी ता.२२- : सावंतवाडी- सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे रविवार २६ नोव्हेंबर रोजी प्रतिवार्षिकप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सवानिमित्त मंदिराच्या पुर्ण परीसरात मातीच्या पणत्या प्रज्वलीत करुन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७.०० वाजता तुलसी विवाह, रात्री ८.०० ते ९.३० या कालावधीत तळवडे येथील सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.३० वाजता नटराज प्रॉडक्शन प्रस्तुत तळशीदास दिग्दर्शित व विश्वकला मंच निर्मित कला विष्कार, नृत्य, हास्य-विनोदांचा खास नजराणा सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
