मळगाव येथील रवळनाथ देवाचा २६ रोजी वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी ता.२२ सहदेव राऊळ- : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री दीपोत्सव व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page