जेम्स संस्थेने कणकवली न.पं.च्या आरोग्य विभागातील अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांचा केला सन्मान…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील स्वच्छतेबाबत देण्यात येत असलेल्या सेवेसाठी कणकवली नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी यांचा जेम्स ह्या सामाजिक संस्थेच्यावतीने ब्राईट मुव्हमेंट या उपक्रमार्तंगत सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कणकवली नगरपंचायतीकडून नागरिकांकडून दररोज ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो तसेच शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे कामही वेळेवर केले जाते. हे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व सफाई कर्मचारी यांचा सन्मान जेम्स या सामाजिक संस्थेकडून उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान चिन्ह देवून करण्यात आला.
या कार्यक्रमाच्यावेळी जेम्स संस्थेचे अमित पोवार व सुजित काणेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या कामाबद्दल अभिप्राय व्यक्त केला.यावेळी जेम्स संस्थेच्या सौ.स्वाती पोवार, सौ.मनिषा काणेकर, व निषीत काणेकर हे उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमास कणकवली नगरपंचायतीचे नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी अमोल आघम, पाणीपुरवठा अभियंता श्रीमती.सोनाली खैरे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत व ध्वजा उचले, लिपिक सतीश कांबळे,शहर समन्वयक वर्षा कांबळे आणि सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा शून्य कचरा कार्यक्रम म्हणून करण्यात आला.कार्यक्रमासाठी एकल वापराचे प्लास्टिकवर बंदी घातली होती. सर्वांना केळीच्या पानावर उपहार देण्यात आला.ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी वेगवेगळे कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले होते.

You cannot copy content of this page