कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले.
कुडाळ न. पं. हद्दीतील अभिमन्यू हॉटेल ते पोस्ट कार्यालयापर्यंत दुतर्फा आरसीसी गटार बांधणे व स्ट्रीट लाईट उभारणे १ कोटी ५ लाख रुपये, कुडाळ शहरातील जिजामाता चौक ते अभिमन्यू हॉटेल पर्यंतची जुनी पाईपलाईन बदलणे ४४ लाख ८२ हजार, ७०० रुपये, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी (पशुवैद्यकीय चिकित्सालय) समोर गटार बांधणे व आरसी लाद्या टाकणे, कुडाळ क्रीडांगण येथे समालोनासाठी शेड बांधणे ४० लाख रुपये, ओंकारनगर येथील यादव घर ते मयेकर घरापर्यंत गटार बांधणे १० लाख रुपये, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील तहसीलदार कार्यालय ते भूमिअभिलेख कार्यालयापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख ९९ हजार ७८४ रुपये, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी स्वस्तिक कॉम्पलेक्स ते कानविंदे घरापर्यंत गटार बांधणे व फरशा बसविणे ९ लाख ९९ हजार ९८८ रुपये, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील अभिनव नगर येथे संरक्षण भिंत बांधणे ४ लाख ९९ हजार ५५८ रुपये या कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेवक उदय मांजरेकर, बबन बोभाटे, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, योगेश धुरी, ज्योती जळवी, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, गंगाराम सडवेलकर, राजू गवंडे, नितीन नेमळेकर, महेश राऊळ, श्रुती वर्दम, राजू कविटकर, बंड्या कोरगावकर,
श्याम माजगावकर, सुधाकर पाटकर, अशोक राऊळ, पद्मजा चव्हाण, नंदिनी कुडाळकर, एकनाथ कुडाळकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश सावंत, शाम माजगावकर, कृष्णा शिंदे, सायमन डिसोझा, साई मांद्रेकर, सुलभा देसाई, विशाल चव्हाण, विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.
