वैद्यकीय महाविद्यालयाची, जिल्हा रुग्णालयाची पदे रिक्त असल्याने समस्या…

अधिष्ठाता डॉ रामानंद यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला माहिती..

⚡ओरोस ता.२२-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे, असे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांनी राष्ट्रवादीच्या शिस्ट मंडळाला सांगितले.


सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील गैरकारभार, अस्वच्छता, रुग्णांना मिळत नसलेल्या सेवा, रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण आदी विविध मुद्यांवर आज राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भास्कर परब, बाळ कन्याळकर, प्रतीक सावंत आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page