युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 23 रोजी सिंधुदुर्गात…

सकाळी दोडामार्ग तर दुपारी सावंतवाडीत: शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मदन राणे यांनी केले..

⚡दोडामार्ग-: शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग येथे येणार आहेत.त्यांची खळा बैठक श्रीम लीना कुबल दोडामार्ग यांचे घरी होणार आहे.तर दुपारी साडेबारा वाजता सावंतवाडी माजगाव येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी खळा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे युवकांची संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाला शिवसेना , युवा सेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page