कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात…

⚡कणकवली ता.२०-: कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या जिर्णोद्वाराचे, काम कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती दीपक दत्ताराम कदम आणि सौ. दिपाली दीपक कदम यांनी आपला पुत्र कै. सोहम दीपक कदम याच्या स्मरणार्थ संपूर्ण मंदिराचे काम स्वखर्चाने करून दिले. सदर मंदिराचे लोकार्पण उद्योगपती दीपक दत्ताराम कदम व कुर्ली गावचे सुपुत्र अनंत गंगाराम पिळणकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.


यावेळी श्री कुर्लादेवी मंदिराचे मानकरी बंडू पाटील,कृष्णा पाटील ,संतोष कदम,अरुण पवार, रमेश पवार, रमेश पाटील, अनिल पाटील,प्रकाश सावंत,भास्कर पाटील, सत्यवान सुतार, दत्तगुरु पिळणकर तसेच उद्योगपती दीपक कदम यांचे मुंबईतील मित्र विलास वाघराळकर, सूर्यकांत रावले, प्रवीण भोसले, मनोहर नारकर, विवेक कदम व गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान थोर सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 22 रोजी माननीय उद्योगपती दीपक कदम यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा व कुर्ला देवीची प्रतिष्ठापना पूजा होणार आहे.

You cannot copy content of this page