⚡बांदा ता.२०-: डेगवे-तांबोळी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून साफसफाई करण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत होता.
समोरच्या वाहनाला बाजू देताना काटेरी वनस्पतींचा छोट्या वाहन चालकांना खूपच त्रास होत होता.
तांबुळीचे माजी सरपंच अभिलाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली घनश्याम सावंत, भास्कर सावंत, मित्तल देसाई, तेजस सावंत, मुन्ना गावडे, बापू तांबुळकर, सिताराम सावंत, बाळकृष्ण सावंत, रवींद्र देसाई, भाई देसाई, डेगवेचे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, आबाजी सावंत यांनी सहभाग घेत रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली. यामुळे वाहनचालक तसेच स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो :-
तांबोळी डेगवे रस्त्याची श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.
