मळेवाड ग्रामपंचायतीचा आता क्यूआड कोड…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवीनी केला सरपंच सौ.पार्सेकर यांच्याजवळ सुपूर्त

⚡सावंतवाडी ता.०६-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

शासनाने ग्रामपंचायतकडील पाणी पट्टी,घरपट्टी व इतर शुल्क हे प्राधान्याने डिजिटल पेमेंट चा वापर करुन भरावे असे आदेश दिले होते.त्यालाच अनुसरून जिल्ह्यातील ग्रामपंचायतना सिंधुदूर्ग जिल्हा बँक कडून क्यू आर कोड देण्यात येत आहेत.ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेजिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीसरपंच मिलन पार्सेकर यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टी साठी स्वतंत्र किंवा आर कोड प्रदान केले आहेत.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत असताना जिल्हा ही जिल्ह्यातील शेतकरी,महिला बचत गट,संस्था,व्यावसायिक,उद्योजक यांचे हात बळकट करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.आता मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट ने व्यवहार होत असून ग्रामपंचायत मधील व्यवहार डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामपंचायत चे विशेष कौतुक केले.तसेच बँकेच्या अनेक योजना आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी संचालक रवींद्र मडगावकर उपस्थित होते.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,स्नेहल मुळीक,अमोल नाईक,अर्जुन मुळीक,कविता शेगडे,शाखा व्यवस्थापक लक्ष्मण गावडे,अमित नाईक,अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page