⚡दोडामार्ग,ता.१९-; किरीट सोमय्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय,निषेध असो निषेध असो,किरीट सोमय्यांचा निषेध असो, अशा घोषणा देत शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील त्यांच्या कार्यालयासमोर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी तीव्र शब्दात निषेध केला.त्यांची प्रतिमा असलेला बॅनरही त्यांनी पायदळी तुडवला.
यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस,युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस,उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी,मिलिंद नाईक,संदेश राणे,शिवराम मोर्लेकर,संदेश वरक आदी उपस्थित होते.
ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्यांचा दोडामार्गात निषेध
