निवडणुकांच्या दृष्टीने भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – निलेश राणे

मालवण (प्रतिनिधी)

काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. ह्याच विकासाच्या जोरावर येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला मत मागायची आहेत. आपल्याला येत्या २०२४ च्या निवडणुकीत गुलाल आपलाच असला पाहिजे. तसंच येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला १०० % यश मिळालेच पाहिजे. त्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कातवड कोळंब येथे आयोजित भाजपच्या टिफिन बैठकीत बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी@ ९ उपक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत रविवारी रात्री मसुरे जि. प. मतदार संघातील कोळंब कातवड येथे माजी खासदार तथा कुडाळ- मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद ‘टिफिन बैठक संपन्न झाली. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यात सुरू असलेल्या मोदी @९ अभियानाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. गेला महिनाभर कुडाळ मालवण मतदारसंघात मोदी @ ९ अभियान अंतर्गत घर घर संपर्क अभियान राबविले जात आहे. त्याचाही आढावा निलेश राणे यांनी घेतला. प्रारंभी माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर यांनी नीलेश राणे यांचे स्वागत केले

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, राजन गावकर, विजय ढोलम, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, आप्पा लुडबे, बबलू राऊत, विरेश पवार, दादा नाईक, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, विजय निकम, संतोष गावकर, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, अमित गावडे, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष विनायक धुरी, भिकाजी परब, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत धुरी, गणेश आचरेकर, उमेश चव्हाण, रामदास ढोलम, निखिल करलकर, निलेश परब, सचिन नरे, अर्जुन चव्हाण, दीपक कोरगावकर, नागेश मोहिते, प्रकाश मोहिते, अमित लोके, दिगंबर लोके, सत्यवान लोके, चंद्रशेखर लोके, उत्तम चव्हाण, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत चौगुले, दाजी कनेरकर, चेतन वस्त, तेजस न्हिवेकर यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page