विकासकामे जलदगतीने करण्याची केली मागणी
ओरोस ता.१७-:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार या सत्ताधारी गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे स्वागत करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रशासनाने पोहोचवाव्यात अशी मागणी करतानाच कोणत्याही नागरिकांवर अन्याय झाल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश गवस, सुरेश सावंत, सावळाराम अणावकर, विनायक गवस, अक्षय खलीस आदी पदाधिकाऱ्यांनी आज राजधानी सिंधुदुर्गनगरीत येत प्रशासन प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यावेळी विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच शासनाच्या प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. शासनाच्या योजना लोकांना न देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. आपल्याला शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे. यासाठी आवश्यक असणारे सहकार्य आम्ही करण्यास तयार आहोत, अशाप्रकारे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
