⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला शहरातील डिलक्स सलून दुकानात अज्ञाताकडून दुकानातील काचा, सिलिंग यांची तोडफोड करून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अद्याप पोलीस घटनास्थळी दाखल झाले नसून पोलीस आल्यानंतरच या दुर्घटने मागचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
शहरातील गावडेश्वर मंदिर समोर शंकर पवार यांचे डीलक्स सलून आहे. अनेक वर्ष ते या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. काल मध्यरात्री कुणीतरी अज्ञाताने दुकानाच्या समोरील बाजूची तोडफोड केली तसेच सगळ्या काचा फोडून सिलिंगचेही नुकसान केले आहे. त्याचबरोबर वरच्या छपरावरील कौले ही फोडून टाकली आहेत. मठ येथील स्वयंभू मंदिरातील फंड पेटी चोरीचे प्रकरण ताजे असतानाच आता शहरात हा चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी योग्य ती माहिती घेऊन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
