केवरी रेस्टॉरंट हॉटेल मालवणी कट्टाच्या माध्यमातून सुरू करतेय सेवा:२० रोजी खवय्यांच्या सेवेत होणार रुजू
कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोल नाक्याजवळ आता राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करणाऱ्यांच्या भुकेची सोय उपलब्ध झाली आहे. “हॉटेल मालवणी कट्टा”च्या नावाने खव्वय्यांच्या जिभेवर रेंगाळणारं चव येथे चाखता येणार आहे. सावंतवाडी येथील केवरी रेस्टॉरंटने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उपलब्ध झाली आहे. २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता याचे उद्घाटन होवून खवय्यांच्या सेवेत रुजू होणार आहे.
यामुळे नाश्ता आणि जेवणासाठी शिरा, उपमा, पोहा, डोसा, घावने चटणी, आंबोळे उसळ, मसाला ऑम्लेट, डाल फ्राय, डाल खिचडी, आलू गोबी, व्हेज हंडी, मलाई कोफ्ता, मशरूम मसाला, अख्या मसुर, पनीर बटर मसाला, पनीर मख्खनवाला, पनीर कोल्हापूरी, मिक्स व्हेजिटेबल, बटर रोटी, व्हेज कबाब, नाॅनव्हेज कबाब, बटर नान, गार्लिक नान, पापड, रोटी, फिश थाली, चिकन थाली, मटण थालीसह, स्पेशल फिश, चिकन आणि मटणाच्या दर्जेदार डिशेश मिळण्याचं एकमेव ठिकाण उपलब्ध झाले आहे.
याशिवाय साॅफ्ट ड्रिंक, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, कस्तर्ड, दही, लस्सी इत्यादी उपलब्ध असून व्हेज बिर्यानी, चिकन बिर्यानी च्या स्पेशल ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत. अधिक माहितीसाठी सचिन केवरी ९१९११२८२१९३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
