⚡मालवण ता.१५-: मातृत्व आधार फाऊंडेशनचे संचालक आणि मालवणच्या पर्यटन क्षेत्रातील उपक्रमशील व यशस्वी पर्यटन व्यावसायिक तसेच महालक्ष्मी ट्रॅव्हल्स व महालक्ष्मी हाऊस बोटचे मालक, देवबागचे सुपुत्र श्री. राजन कुमठेकर यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जुलै रोजी राजा शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह (हिंदू कॉलनी, दादर पूर्व-मुंबई) येथे होणार आहे. या पुरस्काराबद्दल राजन कुमठेकर यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
