एकमेकांना रंग फासत उधळला गुलाल
देवगड ता.१२-:
देवगड जामसंडे व आजुबाजूच्या परिसरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात शांततेत पार पडला देवगड बाजारपेठ मधील महिला, युवक, छोट्या मुलांनी रंगपंचमीचा सण एकमेकांना गुलाल,रंग उधळून पाणीदार फुगे फोडून साजरा केला.
कोरोना संक्रमण नंतर नागरिक सर्व सण उत्सव साजरे करण्यात दंग आहेत त्याचा प्रत्यय रंगपंचमी उत्साहात दिसून आला.देवगड बसस्थानक व्यापारी बंधू रिक्षा व्यावसायिक ,मांजरेकर नाका,कॉलेज नाका,तारामुंबरी फ्रेंड्स सर्कल नाका याठिकाणी त रंगपचमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता रंगपंचमी साजरी करण्यात आली.
