सातोसेत वसुधा धुरी ठरल्या पैठणीच्या मानकरी

⚡बांदा ता.१२-: महिला दिनानिमित्त सातोसे ग्रामपंचायत व महिला ग्रुप सातोसे यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत वसुधा वसंत धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर कावेरी पेडणेकर द्वितीय, शुभदा गवंडी तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.कार्वेकर यांनी केले तर परीक्षण बाळकृष्ण खर्डे व प्रा. गवस यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर उद्घाटन मनीषा सातार्डेकर यांनी केले. यावेळी माजी सरपंच मदन सातोस्कर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंत धुरी, प्रसाद मांजरेकर, उपसरपंच रुपेश साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page