हिवाळेत शिलाई मशीनचे वाटप

जनशिक्षण संस्थेचा पुढाकार ; माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

मालवण दि प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ. उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखालील जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुक्यातील हिवाळे ग्रामपंचायत कार्यालयात महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यासाठी माजी जि. प. वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा केला.

यावेळी जनशिक्षण संस्थानचे समन्वयक विलास हडकर यांच्यासह हिवाळे गावचे सरपंच रघुनाथ धुरी, उपसरपंच लक्ष्मण परब, ग्रामसेवक मळगांवकर, तलाठी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या विद्या पवार, सानिका सावंत, बुथ कमिटी अध्यक्ष विश्वनाथ परब, स्त्री ग्रामशक्ती संघ अध्यक्ष भोगले, सचिव चंदना चव्हाण, CRP आम्रपाली पवार, कोषाध्यक्ष प्राजक्ता आणि, लिपीक रिया गावडे व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी १० महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमावेळी सुत्रसंचालन चंदना चव्हाण हिने केले. तर आभार आम्रपाली पवार हिने मानले.

You cannot copy content of this page