⚡मालवण ता.११-: जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कोळंब – न्हीवे या ५०० मीटर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा गाव अध्यक्ष विनायक धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल निव्हेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ लाड, गणेश आचरेकर, विजय सारंग, भाई ढोलम, तुषार लाड, महेश परब, सचिन नरे, रामदास चव्हाण, अंकुश कातवणकर, संगम प्रभुगावकर, दीपक कवटकर आदी उपस्थित होते.
