⚡मालवण ता.११-: मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सवाचे आयोजन दि. १३ मार्च रोजी करण्यात आले आहे. यनिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे, तसेच रात्री ९ वाजता पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य व गीत सादरीकरण होणार आहे.
त्यानंतर कलांकुर ग्रुप मालवण यांचा ‘मराठमोळा नजराणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये ‘सायलेंस… खटला चालू आहे’ हे नाटक व नृत्ये सादर होणार आहेत. तसेच स्थानिक कलाकारांचे नृत्यविष्कारही सादर होणार आहेत. मांड उत्सवा निमित्त दि. १५ रोजी वाडवळ कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
