दांडी स्मशानभूमीतील लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पूर्ण…

⚡मालवण ता.१०-: मालवण दांडी स्मशानभूमीत जीर्ण झालेले लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम मार्गी लागल्याने स्थानिक माजी नगरसेवकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मालवण शहरातील दांडी येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीचे लोखंडी खांबांची दुरवस्था झाली होती. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी स्थानिक नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हे खांब बदलण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page