युपी येथील कामगाराचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह…

देवबाग येथील राहत्या मांगरात आला आढळून

मालवण (प्रतिनिधी)

देवबाग येथे रंगकाम करणाऱ्या राकेशकुमार शिवराम वय- २३, मूळ रा. ता. हरीया, उत्तरप्रदेश) याने कामगाराचा मृतदेह तो देवबाग राऊळवाडी येथे राहत असलेल्या मांगरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेची खबर अच्युत मायबा यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेशकुमार हा रंगकाम करायचा. देवबाग येथील पाटील यांच्याकडे तो सध्या काम करत होता. राकेशकुमार याच्या मृत्यू मागील कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण हे अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page