वैभववाडी संजय शेळके
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा मनमानी व भोगळ कारभार सुरू असून कामकाजाची कोणती माहिती दिली जात नाही. असा आरोप करत मुख्याधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे त्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका अक्षता जेतापकर यांनी महिला दिनीच तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले दिवभर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करत सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.
नगरपंचायत कारभाराबाबत नगरसेविका जैतापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मासिक सभेत मागणी करूनही लेखापरीक्षण अहवाल मुख्याधिकारी दाखवत नाही. नगरपंचायतीमध्ये किती निधी आला किती व कुठे खर्च झाला. कोणत्या योजनेवर झाला किती शिल्लक आहे. त्याचा कोणता हिशोब दाखविला जात नाही बाजार कर जमा होतो तो ही दाखवला जात नाही माहितीच्या अधिकारात माहिती मागून ही माहिती दिली जात नाही तसेच मनमानी पद्धतीने भरमसाठ करवसुली केली जात आहे. ठरावा दुरुस्ती सुचवल्यास त्याची नोंद घेतली जात नाही. विरोधक असूनही ठराव सर्व मुद्दे मंजूर केला जातो अशा प्रकारे नगरपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून याची चौकशी व्हावी या मागणीसाठी जैतापकर यांनी आरोप करत महिला दिनीच तहसीलदार कार्यालयासमोर दिवसभर उपोषण सुरू होते या उपोषणाला शिवसेनेच्या मानसी सावंत यांनी पाठिंबा दर्शवला होता दिवसभरात उपोषणाची कोणतेही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होती.
मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी महिलादिनीच महिला नगरसेविकेचे उपोषण
